gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाला ‘आविष्कार संशोधन स्पर्धेत’ सुवर्ण व रौप्य पदक प्राप्त

गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाला 'आविष्कार संशोधन स्पर्धेत' सुवर्ण व रौप्य पदक प्राप्त

आविष्कार (राज्यस्तरीय) संशोधन स्पर्धा दि. १२ ते १४ जानेवारी २०२५ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि. रायगड येथे संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील २४ विद्यापीठांमधील ७७७ संशोधन प्रकल्प सहभागी होते. विद्यार्थ्याच्या आविष्कार संशोधन स्पर्धेत पदवी स्तरावर सी १- मानव्यविद्या, भाषा आणि ललित कला गटातून सादर केलेल्या गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालय संशोधन प्रकल्पाला सुवर्ण पदक प्राप्त झाले. तसेच पदव्युत्तर पदवी सी२- वाणिज्य व्यवस्थापन व कायदा या गटातून सादर केलेल्या महाविद्यालयाच्या प्रकल्पाला रौप्य पदक प्राप्त झाले. सदर स्पर्धेचा निकाल दि. १५ जानेवारी २०२५ रोजी जाहीर झाला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती जोपासली जावी, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा व सद्यस्थितीतील समस्यांचे निराकरण कसे करावे यासाठी आविष्कार संशोधन स्पर्धा जिल्हा, विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जाते. महाविद्यालयातून पदवी स्तरावर सुवर्णपदक प्राप्त झालेल्या प्रकल्पाचा ‘बचत गटांच्या आर्थिक प्रगतीच्या मूल्यमापनासाठीची श्रेणीकरण प्रणाली’ हा विषय होता. महाविद्यालयाच्या ग्रामीण विकास विभागातर्फे सदर प्रकल्प सादर केला गेला. माहिती संकलन व सादरीकरण द्वितीय वर्ष कला शाखेचे विद्यार्थी प्रथम गणेश बंडबे, द्वितीय वर्ष कला आणि सुहास बाबासाहेब आंबेकर, द्वितीय वर्ष कला या विद्यार्थांनी केले. या प्रकल्पासाठी प्रशासकीय उपप्राचार्य व विभागप्रमुख डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, प्रा. श्रावणी विभूते, प्रा. विनायक गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. सचिन सनगरे, प्रा. पंकज घाटे, प्रा. निशा केळकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

पदव्युत्तर स्तरावरील रौप्य पदक प्राप्त केलेला प्रकल्प ORC: Instrumenting Centralised ecosystem led by industries for grassroot innovators या विषयाचा वाणिज्य व्यवस्थापन व कायदा या गटातून सादर केला गेला. सदर प्रकल्पासाठी माहिती संकलन व सादरीकरण ऋतुजा शिंदे व चिन्मय प्रभू (पदव्युत्तर समाजशास्त्र) या विद्यार्थांनी केले. या प्रकल्पासाठी डॉ. अजिंक्य पिलणकर यांचे मार्गदर्शन लाभले.

र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतिशजी शेवडे, उपाध्यक्ष अॅड. विजय साखळकर, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला शाखा उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी पदक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Comments are closed.