gogate-college-autonomous-updated-logo

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाच्या आदर्श वाचक पुरस्कारचे वितरण

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयातर्फे अभ्यासेतर आवडीच्या विषयाचे वाचन, नियतकालिकांचे वाचन, वाचनपूरक असे विविध उपक्रम, वैविध्यपूर्ण ग्रंथ प्रदर्शने, पुस्तक परीक्षण, पुस्तक अभिवाचन, वाचन विषयक परिसंवाद, वाचन प्रेरणा दिन अशा वाचन चळवळीला पूरक ठरणाऱ्या ग्रंथालयीन उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेणाऱ्या वाचकाला प्रतिवर्षी ‘ग्रंथरत्न सन्मान’ हा आदर्श वाचक पुरस्कार प्रदान करण्यात येतो. भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील अभ्यास, क्रीडा, संशोधन, विविध स्पर्धा, लेखन-वाचन इ. क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा गुणगौरव केला गेला. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

विद्यमानवर्षीचा कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाचा आदर्श शिक्षक वाचक ‘ग्रंथरत्न सन्मान’ प्रा. सना हिदायत नाखवा, वाणिज्य विभाग, वरिष्ठ महाविद्यालय यांना तर वरिष्ठ महाविद्यालायासाठी असलेला आदर्श विद्यार्थी वाचक ‘ग्रंथरत्न सन्मान’ पुरस्कार कु. श्रद्धा लक्ष्मण हळदणकर, प्रथम वर्ष कला हिला तर कनिष्ठ महाविद्यालायासाठीत असलेला आदर्श विद्यार्थी वाचक ‘ग्रंथरत्न सन्मान’ कु. अनिषा विजय कुरतडकर, बारावी वाणिज्य हिला प्रदान करण्यात आला.

महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये येथे आयोजित बक्षिसवितरण समारंभाला महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, कला विभागाच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. विशाखा सकपाळ, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

आदर्श वाचक पुरस्कारप्राप्त प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि ग्रंथालय कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

h
h
h
Comments are closed.