गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी यांच्या प्लेसमेंट सेल आणि इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलतर्फे शनिवार दि. १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता कॅंपस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. सदर ड्राईव्हमधून ऑपरेशन्स मॅनेजर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, फायनान्स एक्झिक्युटिव्ह इ. जागा भरण्यात येणार आहेत. तरी महाविद्यालयातून कॉमर्स विभागातून B.Com.; BAF; BMS; M.Com. इ. पदवी घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी या संधीचा लाभ घेऊ शकतात.
इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला बायोडेटा व इतर आवश्यक कागदपत्रांसह नियोजित वेळेत महाविद्यालयाच्या वाणिज्य इमारतीत उपस्थित राहावे; अधिक माहितीकरिता महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंतदेसाई (मोबा. ९४२११४२५२९) आणि इन्फिगो लाइफ सायन्सेस प्रा. लि.चे श्री. सुशांत पांचाळ (मोबा. ८८८८०२५७७३) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.