gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘शेअर बाजार आणि गुंतवणुक व्यवस्थापन’ कोर्स प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न

नव्या शैक्षणिक उद्दिष्टांनुसार विद्यार्थी बहुआयामी आणि बहुकौशल्ययुक्त व्हावेत, बदलत्या आव्हानात्मक आर्थिक परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच अर्थार्जनाचे नवे मार्ग उपलब्ध व्हावेत या उद्देशाने गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागामार्फत ‘शेअर बाजार आणि गुंतवणुक व्यवस्थापन’ या एक महिना कालावधीच्या प्रमाणपत्र कोर्सच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी समन्वयक डॉ. आर. ए. सरतापे यांनी सदर प्रमाणपत्र कोर्स सुरु करण्यामागील उद्देश सांगून सर्व उपस्थितांचे स्वागत केले.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी हा प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच या कोर्समधून विद्यार्थ्यांनी घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग भविष्यात आपल्या अर्थार्जनाचा मार्ग म्हणून करावा असे मनोदय व्यक्त केले. या संपूर्ण कोर्ससाठी शेअर मार्केट विश्लेषक श्री. चिन्मय पित्रे आणि प्रा. अमोल सहस्त्रबुद्धे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .

या कार्यक्रमाला कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, महाविद्यालयातील प्रमाणपत्र व डिप्लोमा कोर्सेसचे समन्वयक प्रा. तुळशीदास रोकडे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिनेश माश्रणकर तर आभारप्रदर्शन प्रा. सुर्यकांत माने यांनी केले.

Comments are closed.