मुंबई विद्यापीठ, मुंबई व कोंकण झोन आणि शिक्षण विकास मंडळाचे एस. एच्. केळकर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय. देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २३ ते २५ ऑगस्ट २०२४ रोजी कोंकण झोन पुरुष आणि महिला बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीच्या पुरुष आणि महिला संघाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चे कोकण झोन पुरुष व महिला बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. सदर स्पर्धेत पुरुष संघात ऋग्वेद सरजोशी, मानस सिदये, अनुज पुजारी, अथर्व देसाई, वेदांत सावर्डेकर, यश गोगटे आणि महिला संघात जिज्ञासा सावंत, अस्मिता खानविलकर, श्रेया परुळेकर, प्राची वळंजू, हिमानी फाटक, ग्येयता काळे या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व केले होते.
मुंबई विद्यापीठ कोंकण झोन पुरुष व महिला बुद्धिबळ स्पर्धेत विजेतपद प्राप्त केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना समितीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, प्राध्यापक सहकारी, कर्मचारी आणि सेवक यांनी अभिनंदन केले आणि स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.