gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथे “लर्नर सेंटरिंग मुक्स” प्राध्यापक विकास कार्यक्रम संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी मध्ये पीएम उषा अंतर्गत “लर्नर सेंट्रिक मुक्स” प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे आयोजन शास्त्रशाखेतर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमाचा कालावधी २१ एप्रिल ते २५ एप्रिल २०२५ होता.

पाच दिवस चाललेल्या या कार्यक्रमात मुक्स, ई कंटेंट तयार करणे, ऑनलाईन वेगवेगळे प्लॅटफॉर्म यासंबधी प्राध्यापकांना डॉ मंदार भानुशे यांनी मार्गदर्शन केले. मुक्सचे डिझाईन, तसेच त्यावर व्हिडिओ पूर्वी करावे लागणारे संस्कार, आपल्या व्याख्यानाचा संहिता लेखन याबद्दल प्रा. पंक्ती सुर्वे यांनी अत्यंत सुंदर असे मार्गदर्शन केले. त्यानंतरचा टप्पा म्हणजे व्हिडिओ तयार करण्याचा. त्यातील सर्व खाचाखोचा अतिशय संयत पद्धतीने श्री. अजित पाटील यांनी समजावून सांगितल्या. विद्यार्थ्यांना एकसुरी शिकतोय असं वाटू नये यासाठी त्यांना सतत कार्यमग्न ठेवावे लागते. ऑनलाईन शिक्षणात कोण कोणत्या साधनांचा वापर करून हे करता येईल याविषयी मार्गदर्शन प्रा. अजिता देशमुख यांनी केले. तसेच भारत सरकारचा स्वयम् आणि इतरही मुक्स प्लॅटफॉर्म यांबद्दल प्रा. डॉ. बालाजी यांनी माहिती दिली. शेवटच्या दिवशी ओपन एज्युकेशन रिसोर्स कसे तयार करायचे, कुठल्या प्लॅटफॉर्मवर ते ठेवायचे, हे सर्व करत असताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी हे डॉ. श्रीनिवास यांनी सांगितले.

समारोपाच्या कार्यक्रमाला डॉ. शिवाजी सरगर, डायरेक्टर, सी डी ओ ई, मुंबई विद्यापीठ हे उपस्थित होते. त्यांनी ई कंटेंट बनविणे आणि अद्ययावत असणे किती आवश्यक आहे हे सांगितले. पारंपरिक शिक्षण पद्धती सोडून आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्यावर शिक्षकांनी भर द्यावा असे त्यांनी सुचविले. तसेच मुक्स कोर्स बनवणे हे एकट्याचे काम नसून ते सर्वांनी एकत्र येऊन करावे असे सांगितले. याचबरोबर डॉ. श्रीनिवास यांनी प्राध्यापकांना आचार्य व्हा म्हणजेच आपण शिकलेले आचरणात आणा असा संदेश दिला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन कार्यक्रमाचा आढावा विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी घेतला. डॉ. शिवाजी उकरंडे व प्रा. उमा जोशी यांनी प्रातिनिधिक मनोगत सादर केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सर्व प्राध्यापकांना मुक्स बनविण्यासाठी, पुस्तके प्रकाशित करण्यासाठी प्रेरित केले तसेच शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. मेघना म्हादये यांनी केले.

प्रा.अनुजा घारपुरे, प्रा. रश्मी भावे, प्रा. सचिन सावले आणि प्रा. निशा केळकर यांनी या संपूर्ण ५ दिवसीय कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या प्राध्यापक विकसन कार्यक्रमाला एकूण ५४ प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Comments are closed.