यावर्षीच्या दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन सोहोळ्यामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या दोन छात्रांचा सहभाग असणार आहे. यावर्षी महाविद्यालयाची परंपरा नेवल एन.सी.सी. विभागातील पीओ कॅडेट देवेंद्र खवळे (द्वितीय वर्ष कला) पीओ कॅडेट स्नेहल कनावजे (द्वितीय वर्ष विज्ञान) या दोन छात्रांनी कायम ठेवली आहे. पीओ कॅडेट स्नेहल कनावजे हि परेड करिता तर पीओ कॅडेट देवेंद्र खवळे याची शिप मॉडेलिंगकरिता निवड झाली आहे.
दोन्ही छात्रांना गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Devendra Khavale
Snehal Kanavaje