नेसकॉम आणि देवांग मेहता संस्था आणि संगणकशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्तविद्यमाने देवांग मेहता स्मृती व्याख्यान आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा यांमधील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या उपक्रमात सुमारे १८ महाविद्यालये सहभागी झाली होती. या शिबिरात विद्यार्थ्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राबाबत उत्साह निर्माण करणे, या क्षेत्रातील उत्तम संधी सांगणे, आय. टी. क्षेत्राकरिता सक्षम आणि प्रगत पिढी निर्माण करणे असे उद्देश समोर ठेवण्यात आले होते. अशाप्रकारचा हा उपक्रम प्रथमच आयोजित केला गेला. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील सुमारे ३०० विद्यार्थी आणि २० प्राध्यापक सहभागी झाले होते. श्री. चेन्दील कुमार आणि श्री. भूषण केळकर हे व्याख्याते म्हणून लाभले होते. त्यांनी आय. टी. क्षेत्रातील बदल तसेच नवीन टेक्नोलॉजीतील बदल यावर प्रभावी मार्गदर्शन केले.
गुणगौरव आणि पुरस्कार वितरण सोहोळ्याला क्विक हिल टेक्नोलॉजीचे चीप ऑपरेटिंग ऑफीसर श्री. विजय म्हसकर आणि देवांग मेहता संस्थेचे संचालक श्रीगणेश यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर होते. तसेच नेसकॉमचे विभागीय प्रमुख डॉ. चेतन सामंत, देवांग मेहता संस्थेच्या सौ. मानसी मोरे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अनुजा घारपुरे आदि मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक आणि विद्यार्थ्यानि मेहनत घेतली.