gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाची ‘पर्यावरण सफर’ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा वनस्पतीशास्त्र विभाग आणि पर्यावरण संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच पोमेंडी-देवराई याठिकाणी आयोजित करण्यात आलेली निसर्ग सहल उत्स्फूर्त वातावरणात संपन्न झाली. रत्नागिरी परिसरातील समृद्ध अशा वनराईचा परिचय देण्यासाठी ही निसर्ग सहल आयोजित करण्यात आली होती. पर्यावरण संस्था, रत्नागिरीचे सचिव डॉ. दिलीप सावंत, कार्यकारी सदस्य डॉ. दिलीप नागवेकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन, प्रा. जी. एस. कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

निसर्ग सहलीचा प्रारंभ रेल्वे पुल, गणेश नगर येथून झाला. प्रारंभी डॉ. मंगल पटवर्धन यांनी देवराईची संकल्पना स्पष्ट केली. प्रा. शरद आपटे यांनी पोमेंडी देवराईतील वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींचा परिचय सर्व उपस्थितांना करून दिला. बारतोंडी, उंबर, रानमोडी, साग, मुरुड शेंग, तिरफळ, तिपानी, आईन, किंजळ, बेहडा, कुडा, माकड लिंबू सुरमाड, मधुनाशिनी, अनंतमूळ, पित्तवेल, पहाडवेल, पाठा इ. अनेक वनस्पतींचा परिचय करून दिला.

या निसर्ग सहलीसाठी श्री. राजीव लिमये, जनसंपर्क अधिकारी जिंदाल उद्योग समूह, रत्नागिरी शहरातील निसर्गप्रेमी नागरिक, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, जी.जी.पी.एस. प्रशाला, गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यावरण शिक्षिका प्रा. स्मिता पाथरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी देवराई परिसरातील कचरा गोळा करून त्यांचे निर्मुलन करण्यात आले.

सदर निसर्ग सफर यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मार्गदर्शन आणि डॉ. सोनाली कदम, प्रा. ऋजुता गोडबोले, प्रा. स्मिता पाथरे, प्रा. मयुरेश कांदळकर, प्रा. दातार यांचे सहकार्य लाभले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाची ‘पर्यावरण सफर’ संपन्न
h
Comments are closed.