डी.बी.जे. महाविद्यालय, चिपळूण येथे भूगोल विभागाच्यावतीने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा दि. २२ जानेवारी २०२५ रोजी घेण्यात आल्या. भूगोल विषयातील कौशल्य आत्मसात व्हावीत व विद्यार्थ्यांमध्ये भूगोल विषयाची रुची निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. स्पर्धेचे हे नववे वर्ष असून कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील संघांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन गटात स्वतंत्रपणे सात स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेच्या समारोप प्रसंगी प्रसिद्ध मराठी अभिनेता ओमकार भोजने काही काळ उपस्थित राहिला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या स्पर्धांमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीचे विद्यार्थीही सर्व स्पर्धांमध्ये सहभागी झाले. फोटोग्राफी प्रथम क्रमांक आणि पीपीटी सादरीकरण द्वितीय क्रमांक- सेजल मेस्त्री, नकाशा भरणे प्रथम क्रमांक- श्रीराज रावणांग आणि सानिका बामणे, प्रश्नमंजुषा प्रथम क्रमांक- श्रीराज रावणांग, व्हीलॉग स्पर्धा प्रथम क्रमांक आणि पर्यटन नियोजन स्पर्धा द्वितीय क्रमांक पूर्वा भरणकर व अभिषेक शेलार यांनी प्राप्त केला. याप्रमाणे सात स्पर्धेत चार प्रथम क्रमांक व दोन द्वितीय क्रमांकाची पारितोषिके मिळवून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. या स्पर्धेसाठी प्रा. विनायक गावडे यांनी संघ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडली.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य आणि भूगोल विभाग प्रमुख डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई तसेच कला शाखा उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.