गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्रा. निशा केळकर यांची ‘अॅस्ट्रोनॉंमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स’ या विषयाच्या इंटरनॅशनल ऑलिंपियाड करिता परीक्षक म्हणून निवड झाली. सदर विषयातील दहावे इंटरनॅशनल ऑलिंपियाड यावर्षी भारतात दि. ०९ ते १९ डिसेंबर २०१६ दरम्यान ओरिसामधील भुवनेश्वर येथे संपन्न झाले. या स्पर्धेकरिता जगभरातील ४३ देशांमधील २२० विद्यार्थी सहभागी झाले होते. देशभरातून आलेल्या ५० जणांच्या परीक्षक चमूने स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थांच्या त्या विषयातील प्राविण्याचे मूल्यमापन केले.
एम. एस्सी. परीक्षेत मुंबई विद्यापीठात प्रथम येण्याचा मान प्राप्त करणाऱ्या प्रा. निशा केळकर यांना आता जागतिक पातळीवरील स्पर्धेत परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी प्रा. निशा केळकर यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.