gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२५’ उपक्रम संपन्न

गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत दि. १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ हा कालावधी‘वाचन पंधरवडा’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. वाचन संस्कृती जपली जावी, ती वृद्धिंगत व्हावी तसेच विद्यार्थ्यांनावाचनाची गोडी लागावी, त्यांनाविविध साहित्यप्रकाराची ओळख व्हावी हा सदर उपक्रमाचा हेतू होता.

वाचन विषयक जाणीव निर्माण व्हावी याकरिता वाचन पंधरवडयाच्या निमित्ताने विद्यार्थी व प्राध्यापक यांच्याकरितामहाविद्यालयातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विद्याशाखांतील विद्यार्थ्यांसाठी सामूहिक वाचन, ‘लेखक आपल्या भेटीला’ हा प्रत्यक्ष लेखकाशी संवादविषयक कार्यक्रम, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, मकर संक्रांत या दिनांचेऔचित्य साधून विविध विषयावरील ग्रंथांचे प्रदर्शन, सर्व विद्याशाखांतील प्राध्यापकांसाठी सामूहिक वाचन उपक्रम, अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांसाठी एन.एस.एस. विद्यार्थ्यांमार्फत वाचन उपक्रम, वाचन-संवाद कार्यशाळा, ग्रंथदिंडी तसेच इंग्रजी, हिंदी व मराठी भाषांतील ग्रंथांचे परीक्षण अशा विविध कार्यक्रमांचा यात समावेश होता.

दि. १५ जानेवारी रोजी सदर उपक्रमाचा सांगता समारंभ महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात संपन्न झाला. या सांगताप्रसंगी ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. ‘सध्या मोबाईलच्या जगात आपण सर्वचजण वाचनापासून दूर जात आहोत. अशा उपक्रमांच्या निमित्ताने आपण एक पाऊल निश्चितचपुढे टाकले आहे’, असे प्रतिपादन ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले. अध्यक्षीय समारोपात प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी आपण विविधांगी वाचनविषयक उपक्रम राबविले पाहिजेत; अव्याहत वाचन प्रक्रिया चालू राहिली पाहिजे असे आवर्जून नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या कला शाखेतील प्राध्यापकांनी सामुहिक ग्रंथ वाचन केले. सदर कार्यक्रमप्रसंगी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी ग्रंथालयाला स्वलिखित पाच पुस्तके भेट दिली. या कार्यक्रमाला सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे तसेच कला शाखेतील प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२५’ उपक्रम संपन्न गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२५’ उपक्रम संपन्न गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२५’ उपक्रम संपन्न
Comments are closed.