gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘लर्नर सेंटरिंग मुक्स’ प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे उद्घाटन

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथे पीएम उषा अंतर्गत “लर्नर सेंट्रिक मुक्स” प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान शाखेतर्फे करण्यात आले. कार्यक्रमाचा कालावधी दि. २१ ते ते २५ एप्रिल २०२५ आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. मंदार भानुशे, समन्वयक, सीड, मुंबई युनिव्हर्सिटी यांच्याहस्ते दि. २१ एप्रिल २०२५ करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, सर्व विद्याशाखांच्या उपप्राचार्या आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह श्री. श्रीकांत दुदगीकर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी या प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे आयोजन हे विद्यार्थ्यांना सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने शिकवण्याच्या पद्धती समजून घेण्यासाठी केले असल्याचे सांगितले. 

त्यानंतर कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. मंदार भानुशे यांचा परिचय डॉ. मेघना म्हादये यांनी करून दिला. डॉ. मंदार भानुशे यांनी आपल्या लहानशा मनोगतात अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. पारंपरिक शिक्षण पद्धतीसोबतच आता आपल्याला नवीन ऑनलाईन पद्धतीने देखील शिक्षण घेता आणि देता आले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. AI टूल्सच्या मदतीने पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही शिक्षणपद्धतींचा सुंदर संगम साधून शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक आकर्षक आणि मनोरंजक करता येऊ शकते आणि आता ते गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोप करत असताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी अशाप्रकारच्या ऑनलाईन कोर्सेसची गरज आणि त्यातून विद्यार्थ्यांना अर्जित करता येऊ शकणारी क्रेडिट्स यावर भर दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. मेघना म्हादये यांनी केले.

 

Comments are closed.