गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शिक्षकांसाठी ‘योगशास्त्र’ या विषयावरील पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) अंतर्गत अनुदान प्राप्त झाले. या अनुदानाअंतर्गत विद्यार्थी -शिक्षकांसाठी विविध व्यावसायिक, कौशल्य विकसन प्रमाणपत्र अभ्यासवर्ग, शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा इ. चे आयोजन करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात मंगळवार दि. २२ एप्रिल ते शनिवार दि. २६ एप्रिल, २०२५ या कालावधीत शिक्षकांसाठी ‘एक्स्प्लोरिंग इंडियन नॉलेज सिस्टम थ्रू योगा’ या योग विषयक पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत योगाशी संबंधित तज्ज्ञ व्यक्ती योगविषयक व्याख्याने, संवादात्मकसत्रे, प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहितीसाठी समन्वयक डॉ. निधी पटवर्धन; मोबा. ९४२१४३९६६४ यांच्याशी संपर्क साधावा.
सदर कार्यशाळा संपूर्ण विनाशुल्क असून कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या शिक्षकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. कार्यशाळेचा लाभ अधिकाधिक शिक्षकांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.