gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे महाविद्यालयस्तरीय पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे महाविद्यालय स्तरावर ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. आजच्या स्पर्धेच्या युगात संगणकाद्वारे सादरीकरणाला खूप महत्त्व आहे. हेच कौशल्य विद्यार्थ्यांमद्धे निर्माण व्हावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन महाविद्यालयाच्या गणित विभागाने सदर स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत टी.वाय.बीएस्सी.; एम.एस्सी. भाग- १ आणि २ (विषय गणित) या वर्गातील ६८ स्पर्धक २४ गटातून सहभागी झाले.

फाटक प्रशालेशी सलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील गणित शिक्षक श्री. राजीव गोगटे आणि बारटक्के माहिती तंत्रज्ञान विभागात कार्यरत असलेले श्री. अभिजित भाट्ये यांनी स्पर्धेचे परिक्षण केले.

गणिताशी सबंधित कोणत्याही विषयावर सादरीकरण करण्याची निवड स्पर्धकांना होती. गणिताचा विविध स्तरावर होणारा वापर या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांनी कौशल्याने सादर केला.

या स्पर्धेच्या सांगताप्रसंगी गणित विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या अॅड ऑन कोर्समधील यशस्वी विद्यार्थांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे आहेत. प्रथम क्रमांक ओमकार जावडेकर, नचिकेत देसाई, सौरभ शिर्के (टी.वाय.बीएस्सी.); द्वितीय क्रमांक मयुरी केतकर, सीना घाग, योगिता पाध्ये (एम.एस्सी., भाग-१) आणि तृतीय क्रमांक ओमकार शंकरदास आणि विराज धुरी (टी.वाय.बीएस्सी.) यांना सांगता समारंभाचे अध्यक्ष असलेल्या गणित विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे आणि परीक्षकांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. उमा जोशी यांनी केले. डॉ. राजीव सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली.

Comments are closed.