गोगटे जोगळेकर महाविद्याल (स्वायत्त), रत्नागिरीच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमिनित्त ‘ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन’ करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. हरीसिंग गौर केंद्रीय विद्यापीठ, सागर, मध्यप्रदेश येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रकाश कांबळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्याल (स्वायत्त) महाविदालायाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, ग्रंथालय समिती सामान्वक डॉ. कल्पना आठल्ये, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर ग्रंथप्रदर्शनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र आणि लेखन साहित्य, भारतीय राज्यघटना, भारतीय संविधान, भारतीय लोकशाही आणि राज्यशास्त्र विभागातील विविध ग्रंथ प्रदर्शित करण्यात आले. हे ग्रंथ प्रदर्शन वाचकांकरिता दोन दिवस खुले ठेवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी तर आभारप्रदर्शन सहा. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले. या ग्रंथप्रदर्शनाला प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.