gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात एच.डी.एफ.सी. बँकेतील नोकरीच्या संधीविषयक मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल’ आणि एन.आय.आय.टी., मुंबई यांच्या सहकार्याने बुधवार दि. १४ जानेवारी २०२६ रोजी एच.डी.एफ.सी. बँकेतील असिस्टंट मॅनेजर (ब्रँच ऑपरेशन्स) या पदांकरिता मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचा सेमिनार सकाळी ९.३० वाजता महाविद्यालयाच्या आवारात एम.बी.ए. इमारत येथे आयोजित करण्यात आला आहे.  

सेमिनारसाठी तृतीय वर्ष पूर्ण तसेच तृतीय वर्ष बी.कॉम., बी.कॉम. (मॅनेजमेंट स्टडीज), बी.कॉम. (अकौटिंग  अँड फायनान्स), बी.बी.ए. त्याचप्रमाणे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले तसेच पदव्युत्तर भाग १ व २ सुरु असलेले, एम.ए.; एम. कॉम.; एम.एस्सी.; एम.बी.ए.चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात. 

सेमिनारविषयीच्या अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंतदेसाई   (मोबा. ९४२११४२५२९) आणि एन.आय.आय.टी.चे श्री. सर्वेश दामले (मोबा. ८९९९२९५८४४) यांचेशी संपर्क साधावा. या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

Comments are closed.