कोर्सच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. दीपकशेठ गद्रे; गद्रे मरीन इक्सपोर्ट प्रा. लि.चे संस्थापक संचालक यांनी ‘गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने सुरु केलेला बॉशचा ‘ब्रीज’ हा एम्प्लॉबीलिटी स्कील कोर्स विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवेल’ असे गौरवोद्गार काढले, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. महाविद्यालयाच्या करियर गायडन्स अॅड प्लेसमेंट सेल आणि रत्नागिरीतील ध्येय अकादमी व आर. पिज् अकादमी यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या बॉश इंडिया लि. या कंपनीने तयार केलेला ब्रीज हा एम्प्लॉयबिलिटी स्कील कोर्सचा उद्घाटन समारंभ गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला; या समारंभाला प्रमुख अतिथी आणि उद्घाटक म्हणून श्री. दीपकशेठ गद्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी भूषविले; त्यांनी या उपक्रमाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी सदर कोर्स सुरु करण्यामागील महाविद्यालयाचा हेतू स्पष्ट केला तसेच हा कोर्स महाविद्यालयात सुरु होणे हा भाग्याचा क्षण असल्याचे म्हटले. रत्नागिरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. राहुल पंडित या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर तसेच तीनही विभागांचे उपप्राचार्य उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांपैकी एक असलेला ब्रीज हा एम्प्लॉयबिलिटी स्कील कोर्स एक मैलाचा दगड ठरणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. पिज् अकादमीचे श्री. राधेय पंडित यांनी; ध्येय अकादमीच्या सौ. पुजेश्वरी कदम यांनी प्रास्ताविक केले. प्लेसमेंट सेलच्या वाटचालीचा आढावा घेऊन कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांनी केले.