gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या आय. टी. विभागाची ‘In-House पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन & वेब डेव्हलपमेंट’ स्पर्धा संपन्न

In-House पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन & वेब डेव्हलपमेंट

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ‘जागतिक संगणक साक्षरता दिनाचे’ औचित्य साधून दि. ०२ डिसेंबर २०२४ रोजी “In-House पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन & वेब डेव्हलपमेंट” या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यात माहिती तंत्रज्ञान विभागातील २४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धेसाठी श्रीम. शलाका आग्रे (संगणकशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय) तर वेब डेव्हलपमेंट स्पर्धेसाठी श्री. अमित पालकर(बारटक्के इन्स्टिट्यूट, रत्नागिरी) यांनी परिक्षक म्हणून काम पहिले.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:
पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन:
१) सानित सरफरे – SY – प्रथम क्रमांक;
२) सुहानी बेरा – FY – द्वितीय क्रमांक;
३) संस्कृती जाधव – FY – तृतीय क्रमांक (विभागून);
४) जर्नुर म्हसकर – SY- तृतीय क्रमांक (विभागून).

वेब डेव्हलपमेंट :
१) ऋतिक बने – TY – प्रथम क्रमांक;
२) रोहन पाष्टे – SY – द्वितीय क्रमांक;
३) दानिया मालगुंडकर – SY – तृतीय क्रमांक.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या सोबतच परीक्षकांनी आपले मोलाचे मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयटी विभागातील प्रा. अदिती जोशी, प्रा. सौरभ भोसले, प्रा. श्रावणी केतकर, प्रा. झीनत शहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अथर्व चव्हाण, मुस्कान पगारकर यांनी विद्यार्थी समन्वयक म्हणून तसेच लॅब असिस्टंट- शुभम पाटील, लॅब अटेंडंट- निलेश शिंदे आणि विभागातील सर्वच विद्यार्थ्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. मेधा सहस्रबुद्धे, आयटी को-ऑर्डीनेटर श्रीमती.अनुजा घारपुरे यांनी मार्गदर्शन केले तर स्पर्धेतील सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी हार्दिक अभिनंदन केले.

In-House पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन & वेब डेव्हलपमेंट In-House पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन & वेब डेव्हलपमेंट
Comments are closed.