गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) विभागाने प्रतिवर्षाप्रमाणे दि. १६ जानेवारी २०२६ रोजी ‘विभागस्तरीय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’ स्पर्धा आयोजित केली होती. यात आय.टी. विभागातील २४ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धेसाठी श्रीम. विदुला भोसले (सेल्सफोर्स डेव्हलपर, रत्नागिरी) यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. सदर स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे. कु. संस्कृती जाधव, द्वितीय वर्ष, प्रथम क्रमांक; कु. सुहानी बेरा, द्वितीय वर्ष, द्वितीय क्रमांक तर कु. निधी सावंत, प्रथम वर्ष, हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यासोबतच परीक्षकांनी आपले मोलाचे मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना केले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आय.टी. विभागातील प्रा. श्रावणी केतकर यांनी शिक्षक समन्वयक आणि झर्नुर म्हसकर, युस्रा पठाण व अस्फिन धामस्कर यांनी विद्यार्थी समन्वयक म्हणून काम पहिले. प्रा. अदिती जोशी, प्रा. नेहा जोग, लॅब असिस्टंट श्री. शुभम पाटील, लॅब अटेंडंट श्री. निलेश शिंदे आणि विभागातील सर्वच विद्यार्थ्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. मेधा सहस्रबुद्धे, समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे आणि शास्त्रशाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. स्पर्धेच्या संयोजानाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी मार्गदर्शन केले.
