कोकणातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी कटिबद्ध असलेल्या कोकण प्रज्ञा शोध परीक्षा २०१६ करिता यावर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यातून यावर्षी ३ हजार ८१४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून तीन जिल्ह्यातील ४३ परीक्षा केंद्रे आहेत. यावर्षीची कोकण प्रज्ञा शोध परीक्षा रविवार दि. ०८ जानेवारी २०१७ रोजी संपन्न होणार आहे. सदर परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी आणि उर्दू अशी तीन माध्यमे आहेत.
कोकण प्रज्ञा शोध परिक्षा २०१ ६-१७ साठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांची शाळानिहाय, केंद्रनिहाय द्यार्थी यादी व प्रवेशपत्रे दि २५ डिसेंबर २०१६ पासून महाविद्यालयाच्या www.resgjcrtn.com या संकेत स्थळावर उपलब्ध होतील. प्रत्येक शाळेने आपापल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे डाउनलोड करून विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्राची प्रिंट विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी. विद्यार्थ्यांनी त्यावर आपला फोटो चिकटवून आपली स्वाक्षरी करावी व नंतर प्रवेशपत्रावर शाळेचा शिक्का व मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घ्यावी. परिक्षेला येतेवेळी विद्यार्थ्याने आपल्यासोबत सदर प्रवेशपत्र आणावे. अपरिहार्य कारणाने प्रवेशपत्रे डाउनलोड करून प्रिंट करणे शक्य न झाल्यास गोंधळून न जाता ८०८७८६१८१७ (प्रा. दिलीप शिंगाडे) अथवा ९४२११३९२९६ (प्रा. विवेक भिडे) या क्रमांकावर संपर्क साधावा. विद्यार्थ्याने सोबत प्रवेशपत्र नसले तरीही परीक्षाकेंद्रावर परिक्षेसाठी वेळेवर उपस्थित राहावे. कोणताही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार नाही. दि. १५ डिसेंबर २०१६ नंतर किंवा उशिरा नावनोंदणी केलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर परिक्षेपूर्वी दोन दिवस उपलब्ध होईल; असे कोकण प्रज्ञा शोध परीक्षेचे संचालक आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.