गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभागातर्फे दि. ११ ऑक्टोबर २०१७ रोजी ‘मानवी हस्तक्षेपाचा देवराईवर होणारा परिणाम’ या विषयावरील प्रा. नागेश दफ्तरदार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. देवराई ही संकल्पना स्पष्ट करून अशी देवराई प्रस्थापित करण्यामागील तत्कालीन समाजाची भूमिका आणि इतिहास याविषयीची सविस्तर माहिती प्रा. दफ्तरदार यांनी उपस्थित विद्यार्थी आणि प्राध्यापकांना दिली. कोकणातील देवराया म्हणजे संरक्षित वने असून सद्यस्थितीत त्या ‘जनुक पेढी’ म्हणून महत्वाची भूमिका निभावत आहेत. त्यामुळे मानवी हस्तक्षेपामुळे देवारायांवर होणारे अनिष्ट परिणाम रोखून त्यांचे संवर्धन करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन, विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. शरद आपटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर श्री. नाथप्रसाद बारस्कर यांनी प्रा. दफ्तरदार तसेच उपस्थित श्रोतुवार्गाचे आभार मानले.