गोगटे- जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयात दि. २७ फेब्रुवारी रोजी डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये मराठी भाषा गौरव दिन संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख डॉ. शिवराज गोपाळे यांनी मराठी विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचा तसेच कुसुमाग्रजांचे साहित्यातील योगदानयाबाबत आढावा घेतला. मराठीभाषा गौरवदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अभ्यागत सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी ‘माझं जगणं, माझी भाषा’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भाषा आणि आपलं जगणं वेगळं करता येत नाही. जिथे माणसं आहेत तिथे भाषा आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठमोळ्या संस्कृतीचेजतन व संवर्धन व्हावे या हेतूने विद्यार्थ्यांकरिता मराठमोळी खाद्यपदार्थ तसेच मराठमोळी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतीलप्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.
सदर कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयात होणाऱ्या भाषाविषयक उपक्रमांचा आढावा घेऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी सेजल मेस्त्री हिने केले. या कार्यक्रमाला प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई,कला शाखा उपप्राचार्या डॉ.कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उप्राचार्या डॉ. सीमा कदम, सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे, ज्येष्ठ रंगकर्मी विलास कोळपे, प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘मराठी साहित्य’ विषयक ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
![]() |

