gogate-college-autonomous-updated-logo

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात मराठी भाषा गौरव दिन ग्रंथ प्रदर्शन आयोजित करून साजरा करण्यात आला. दि. २७ फेब्रुवारी रोजी कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म दिवस. ते एक प्रसिद्ध कवी, नाटककार, कादंबरीकार, लघुकथाकार आणि मानवतावादी होते. त्यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सदर ग्रंथ प्रदर्शनामध्ये कोशवाङ्मय, संदर्भ ग्रंथ, मराठी अभिजात साहित्य, धार्मिक ग्रंथ, काव्य संग्रह इ. ग्रंथ प्रदर्शित करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी गुलाबपुष्प देऊन केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कला विभागाच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, ग्रंथालय समिती समन्वयक आणि संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. अतुल पित्रे, डॉ. एस. डी. मधाळे, मराठी विभागप्रमुख डॉ. शिवराज गोपाळे, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, प्रा. नेहा शिवलकर, प्रा. डी एस. कांबळे, प्रा. भाग्यश्री सावंत आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी ‘मराठी भाषा गौरव दिनाचे’ महत्व विषद केले. त्या त्या काळात मराठी भाषा कशी जपण्यात आली ते सांगताना समाजातील विविध विभूतींनी मराठी भाषा कशी जपली ते सांगितले. कवी कुसुमाग्रज यांचे योगदान खुप मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर ग्रंथ प्रदर्शन दोन दिवस ग्रंथ प्रेमींसाठी खुले राहणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी तर आभारप्रदर्शन ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी केले.

मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषा गौरव दिन
Comments are closed.