gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे – जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) “मराठी राजभाषा दिन” उत्साहात संपन्न

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात दि. २७ फेब्रुवारी रोजी डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये मराठी राजभाषा दिन संपन्न झाला. प्रथम वर्ष कलाते पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख डॉ. शिवराज गोपाळे यांनी मराठी विभागातर्फे राबविले जाणारे विद्यार्थीहितैषी कार्यक्रम तसेच कुसुमाग्रजांचे साहित्यातील योगदानयाबाबत आढावा घेतला.

मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून नृत्य, नाटय, गायनयांनी युक्त असे विविधांगी कार्यक्रम विद्यार्थ्यांनीसादर केले. विविध गुणदर्शन कार्यक्रमात अभंग,भारुड, स्वरचितकविता, कविता अभिवाचन,भजन, मंगळागौर, अभंगावर आधारित नृत्ययांचे सादरीकरण करण्यात आले. मराठमोळी संस्कृती जपली जावी, ती लोकांपर्यंत पोहचावी या हेतूने विद्यार्थ्यांकरिता मराठमोळी खाद्यपदार्थ तसेच मराठमोळी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

मराठमोळया खाद्यपदार्थ स्पर्धेत अनुक्रमे प्रथम क्रमांक यशश्री नागवेकर , द्वितीय क्रमांक पर्णिका भडकमकर तर तृतीय क्रमांक श्रेयस पाटील यांना देण्यात आला. या स्पर्धेला परीक्षक म्हणून डॉ. अतुल पित्रे व डॉ. मधुरा मुकादम यांनी काम पहिले. मराठमोळया वेशभूषा स्पर्धेत श्रेया सावंत, साहिल कदम व पल्लवी पारकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले.या स्पर्धेला परीक्षक म्हणून डॉ. निधी पटवर्धन व डॉ. सीमा वीर यांनी काम पहिले.

मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगतात, “आपण जास्तीत जास्त व्यवहार जीवनात मातृभाषेतूनच संवाद केला पाहिजे. तरच मराठी भाषा प्रवाही राहील.” असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षाकला शाखा उपप्राचार्या प्रो.डॉ.चित्रा गोस्वामी यांनी केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी तन्वी फडके हिने केले.सदर कार्यक्रमाला बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

सदर दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘मराठी साहित्य’ विषयक ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयाचे मा.प्राचार्यडॉ.मकरंद साखळकर यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन झाले.उद्घाटनप्रसंगी आपल्या मनोगतात त्यांनीमराठी भाषेची समृद्धता, जीवनातील तिचे स्थानव मराठी गौरव भाषा दिनाचे महत्त्व यावर विचार व्यक्त केले. याप्रसंगी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, ग्रंथालय समिती समन्वयक डॉ.कल्पना आठल्ये, ग्रंथपाल किरण धांडोरे उपस्थित होते.

Comments are closed.