gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. २० जानेवारीपासून ‘मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे’ आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील इतिहास विभागातर्फे मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालय, मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित या वर्गामध्ये मोडी लिपीचा इतिहास, अक्षर ओळख, तसेच वाचन व लेखन याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन केले जाणार आहे.

सदर प्रशिक्षण वर्ग सर्वांसाठी खुला असून, यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल.

मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग दि. २० जानेवारी ते ३० जानेवारी २०२५ या कालावधीत संध्याकाळी ४.०० ते ०६.०० या वेळेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित केला जाईल. मोजक्या जागाच उपलब्ध असल्याने इच्छुकांनी त्वरित नाव नोंदणी करावी.

मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाविषयी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी प्रा. पंकज घाटे, इतिहास विभाग, मोबा. 9970438428 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त)चे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

Comments are closed.