gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे उपकेंद्र , रत्नागिरी यांच्यामध्ये सामंजस्य करार

गोगटे जोगळेकरमहाविद्यालय(स्वायत्त),रत्नागिरीआणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेकचे डॉ. पी. व्ही. काणे उपकेंद्र, रत्नागिरी यांच्यामध्ये दि. ०६ मार्च २०२५ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेकचे कुलसचिव डॉ. देवानंद शुक्ल, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. पी. व्ही. काणे उपकेंद्र संचालक डॉ. दिनकर मराठे, चाणक्य विद्यापीठ बंगळूरचे डॉ. विनायक रजत भट, सामंजस्य करार समन्वयक प्रा. कश्मिरा दळी, ज्युनिअर कॉलेज उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी उपस्थित होते. याप्रसंगी संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी प्रास्ताविक आणि महाविद्यालयाचा परिचय करून दिला. उपकेंद्र संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी मागील सामंजस्य करारा अंतर्गत झालेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. त्यावर चर्चा होऊननवीनसामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. कुलसचिव डॉ. देवानंद शुक्ल यांनीआपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालाच्या प्रगतीसाठीआणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संस्कृत भाषा आणि साहित्य, भारतीय तत्त्वज्ञान, प्राचीन भारतीय विज्ञान, भारतीय ज्ञानपरंपरा, संस्कृत माध्यमाने समाजोपयोगी उपक्रम या सर्व क्षेत्रांमध्ये दोन्ही संस्थांच्या एकत्र सहकार्याने विविध उपक्रम आयोजित करणे हे या सामंजस्य कराराचे मुख्य उद्देश आहेत. या अंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. भविष्यात या कराराअंतर्गत सर्टिफिकेट कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस, सेमिनार, वर्कशॉप, संशोधन प्रकल्प यांचे संयुक्त आयोजन केले जाणार आहे. यापूर्वीही गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा संस्कृत विभाग आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक चे डॉ. पी. व्ही. काणे उपकेंद्र, रत्नागिरी यांच्यामध्ये सामंजस्य करार होता. या कालावधीत संयुक्त विद्यमाने धर्मशास्त्र विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भारतीय कालगणना वर्ग, सरलमानक कार्यशाळा, गणित कार्यशाळा, भारतीय ज्ञान परंपरा कार्यशाळा इ. चे आयोजन करण्यात आले होते.
संस्कृत भाषा संवर्धन आणि प्रचार प्रसारासाठी दोन्ही संस्था सतत कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना अधिकाधिक उत्तम शैक्षणिकआणि संशोधन संधी रत्नागिरीत उपलब्ध व्हाव्या आणि दोन्ही संस्थांचेसहकार्य वृद्धिंगत व्हावे यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी शुभेच्छा दिल्या.
या करारावेळी संस्कृत विभागाच्या प्रा. स्नेहा शिवलकर, प्रा. प्रज्ञा भट आणि डॉ. पी. व्ही. काणे उपकेंद्राचे प्रा. अविनाश चव्हाण उपस्थित होते.

Comments are closed.