gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) श्री. महेंद्र तांबे यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) ग्रंथालयीन कर्मचारी श्री. महेंद्र तांबे यांचा महाविद्यालयातर्फे सेवा निवृत्तीनिमित्ताने निरोप आणि शुभेच्छा समारंभ नुकताच संपन्न झाला. आपल्या प्रदीर्घ सेवेत सुरुवातीच्या काळात महाविद्यालयाच्या कार्यालयातील सेवक म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या श्री. तांबे यांना ग्रंथालयात सेवक म्हणून जबाबदारी देण्यात आली.

यावेळी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. चित्र गोस्वामी यांनी त्यांना महाविद्यालयातर्फे शाल, श्रीफळ आणि स्मृती चिन्ह देऊन गौरविले. आपल्या शुभेच्छापर मनोगतात डॉ. चित्र गोस्वामी यांनी व्यक्तीची कार्य संपन्नता व्यक्तीला कर्तृत्व संपन्नतेकडे घेऊन जाणारी ठरते; हे तांबे यांच्या कर्तृत्वाने शिद्ध झाला आहे असे सांगून गुणी कर्मचाऱ्यांच्या जोरावरच महाविद्यालयाला उच्च शिखरे गाठणे शक्य होते. त्यांचा हा आदर्श आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेऊन कार्यरत राहावे असे आवाहन केले.

संस्थेच्यावतीने श्री. तांबे यांचा यथोचित सत्कार करून आपल्या भावना व्यक्त करताना संस्था प्रतिनिधी प्रा. महेश नाईक यांनी गेल्या ३० वर्षांच्या काळात श्री. तांबे यांना केलेले सहकार्य आणि तांबे यांनी दिलेला प्रतिसाद याचा उल्लेख करून त्यांच्या कामाच्या जोरावर ते सर्वांना प्रेरक राहतील असे सांगितले.

सत्काराला उत्तर देत असताना तांबे यांनी वेळोवेळी महाविद्यालय आणि संस्था यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख केला. या मदतीच्या जोरावरच आपल्या अपत्यांना चांगले उच्च शिक्षण देणे शक्य झाले त्यामुळे महाविद्यालय आणि संस्था यांचा मी आजन्म आभारी असल्याची भावना व्यक्त केली. ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी तांबे यांच्या ग्रंथालयातील कामाची, त्यांनी जोपासलेल्या छंदांची आणि योजलेल्या भविष्यकालीन योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. दिवाकर करवंजे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

 श्री. महेंद्र तांबे यांचा शुभेच्छा समारंभ  श्री. महेंद्र तांबे यांचा शुभेच्छा समारंभ
Comments are closed.