gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे कर्मचारी श्री. रवींद्र गोरे सेवानिवृत्त

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी श्री. रवींद्र त्र्यंबक गोरे त्यांच्या नियत वयोमानाप्रमाणे दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी ३५ वर्षे आणि ५ महिने सेवा करून सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्तीपर सदिच्छा देण्याचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या कै. डॉ. ज. शं. केळकर सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर र. ए. सोसायटीचे सहकार्यवाह  प्रा. श्रीकांत दुदगीकर, संस्थेच्या आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष प्रा. महेश नाईक, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, श्री. रवींद्र गोरे आणि त्याच्या सुविद्य पत्नी उपस्थित होत्या. संस्थेच्यावतीने श्री. गोरे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर यांनी सत्कार केला. महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी श्री. गोरे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन सत्कार केला.   

याप्रसंगी बोलताना प्रा. श्रीकांत दुदगीकर यांनी श्री. गोरे यांच्या महाविद्यालयासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला आणि त्यांना सेवानिवृनंतरच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी                        श्री. गोरे यांची महाविद्यालयातील कामाची पद्धत, कामावरील निष्ठा आणि जबाबदारी या गोष्टींचा उल्लेख करून सेवानिवृत्तीनंतरच्या वाटचालीसाठी महाविद्यालयातर्फे शुभेच्छा दिल्या.  

प्रा. महेश नाईक, प्रा. सुनील गोसावी, श्री. प्रसाद गवाणकर आणि श्री. महेश सरदेसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करून श्री. गोरे यांना शुभेच्छा दिल्या. श्री. रवींद्र गोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या सेवेच्या सृरुवातीपासूनच्या काळाचा आढावा घेतला आणि महाविद्यालयात सेवा करताना आलेले अनुभव कथन केले.   

  महाविद्यालयाच्या कर्मचारी पतपेढीतर्फे श्री. गोरे यांना धनादेश आणि भेटवस्तू देण्यात आली. या सेवानिवृत्तीपर सदिच्छा समारंभाला श्री. गोरे यांचे सहकारी, मित्रमंडळी, नातेवाईक आणि महाविद्यालयीन कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. 

Collage Program
Comments are closed.