gogate-college-autonomous-updated-logo

मुंबई विद्यापीठ पुरुष व महिला तायक्वांदो स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीच्या पुरुष व महिला संघाची उज्ज्वल कामगिरी

GJC_SPORTS DEPT 1

मुंबई विद्यापीठ पुरुष व महिला तायक्वांदो २०२६ स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीच्या पुरुष व महिला संघाने १ सुवर्ण पदक, १ रौप्य पदक आणि २ कांस्य प्राप्त करीत महाविद्यालयाच्या महिला संघाने मुंबई विद्यापीठ महिला तायक्वांदो स्पर्धा २०२६ चे सर्वसाधारण उप-विजेतेपद पटकावले. दि.२ ते ५ जानेवारी २०२६ रोजी मुंबई विद्यापीठ, मुंबई आणि डॉ. तात्या साहेब नातू, आर्ट्स आणि कॉमर्स महाविद्यालय मार्गताम्हणे, गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठ पुरुष व महिला आंतर महाविद्यालयीन पुरुष व महिला तायक्वांदो स्पर्धा-२०२६चे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत महाविद्यालयाच्या महिला संघात कु. श्रुति चव्हाण (५४ कि. ग्रॅम.) सुवर्ण पदक; कु. समर्था बने (४६ ते ४९ कि. ग्रॅम.) रौप्य पदक प्राप्त केले तर कु. सई सावंत (+ ७३ कि. ग्रॅम.); कु. पार्थ गावडे (५४ ते ५८ कि. ग्रॅम.) या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तर पुरुष संघातील कु. सुजल सोळंके (६८ ते ७४ कि. ग्रॅम) कांस्य पदक पदक; कु. देवेन सोपल (५४ कि. ग्रॅम.) कांस्य पदक प्राप्त केले.

महाविद्यालयाच्या पुरुष व महिला तायक्वांदो संघाला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ विनोद शिंदे, प्रशिक्षक श्री. शाहरूख शेख, प्रा. कल्पेश बोटके यांचे मार्गदर्शन लाभले तर जिल्हा तायकवाँदो असोशिएशन चे सहकार्य लाभले.

सर्व विजयी खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी अभिनंदन केले आहे.

Comments are closed.