गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात‘राष्ट्रीय मतदार दिन’ नुकताच साजरा करण्यात आला. नवमतदारांमध्ये मतदार प्रक्रियेसंदर्भात जनजागृती होऊन मतदान प्रक्रियेत त्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा, या हेतूने भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रतिवर्षी देशभरात दि. २५ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर विद्यमान वर्षी राज्यशास्त्र विभागाच्या वतीने महाविद्यालयात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी राज्यशास्त्र विभागातील प्रा. निलेश पाटील यांनी विद्यार्थांनाराष्ट्रीय मतदार दिनाची पार्श्वभूमी, तो साजरा करण्याचा प्रमुख उद्देश, निवडणूक प्रक्रिया इ. ची माहिती सांगितली. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून, सशक्त, सुदृढ भारताच्या निर्मितीसाठी मतदानाच्या टक्केवारी वाढीबरोबरच उमेदवार निवड गुणवत्ताही वाढली पाहिजे, असे मत त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. तसेच याप्रसंगी महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळातील काही विद्यार्थी प्रतिनिधी आणि राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी नवमतदार विद्यार्थ्यांनाराष्ट्रीय मतदार दिनी घ्यावयाची शपथ दिली.
हा कार्यक्रम यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन तर कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखा उपप्राचार्या अनुक्रमे डॉ. चित्रागोस्वामी, डॉ. यास्मिन आवटे, डॉ. अपर्णा कुलकर्णी, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.