gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय ‘नेचर वॉक’चे आयोजन

रत्नागिरी परिसरातील समृद्ध वनराईचा परिचय होण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालायचा वनस्पतीशास्त्र विभाग आणि पर्यावरण संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १२ जानेवारी रोजी पोमेंडी येथील महालक्ष्मी मंदिर देवराई परिसरात या नसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय, महाविद्यालयीन आणि विविध वयोगटातील नागरिक या निसर्ग सहलीत सहभागी होऊ शकतात.

दि. १२ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत या निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात असून सहभागी होण्यासाठी निसर्ग प्रेमींनी रेल्वे पुल, गणेश नगर, कुवारबाव (आर.टी.ओ. कार्यालयाजवळ) सकाळी ८ वाजता उपस्थित राहावे. अधिक माहितीकरिता प्रा. शरद आपटे (मोबा. ९४२३२९०९५) आणि डॉ. सोनाली कदम (मोबा. ९४२०५२४६४६) यांचेशी सर्व निसर्ग प्रेमींनी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.