रोझरी कॉलेज, गोवा येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील नॉएसिस इव्हेंट २०२५ मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. नॉएसिस इव्हेंट २०२५ मध्ये विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यानी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. ज्यामध्ये “Offline Playzone – Gamers Grow” स्पर्धेत रितिक दुबे व नयन गुरव यांनी पहिला पुरस्कार मिळवला. “Bug It” स्पर्धेत वृशकेत मुळये व वेदांग पाटणकर यांनी दुसरे स्थान मिळवले, तसेच “Pitch Perfect” व “Rebuttal Rebels” या दोन स्पर्धांमध्ये पार्थ मुळये व वैष्णवी शिरसाठ यांनी दुसरे स्थान मिळवले. विद्यार्थ्यानी विविध तांत्रिक आणि गेमिंग स्पर्धांमध्ये समस्या सोडवण्याची क्षमता, सहकार्य आणि सर्जनशीलता दाखवली.
हे यश गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या उच्च दर्जाच्या शिक्षण आणि समर्थनाचे प्रतिबिंब आहे असे मत प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी व्यक्त केले. संपूर्ण स्पर्धेमध्ये विद्यार्थ्याना सहायक प्राध्यापक सुदिप कांबळी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. स्पर्धेतील विजेत्यांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ. सुरेन्द्र ठाकूरदेसाई, विज्ञान शाखेच्या उप-प्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. तसेच आयटी आणि संगणकशास्त्र विभागाच्या समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे आणि विभाग प्रमुख श्री. अमोल सहस्रबुद्धे यांच्या कष्टांची विशेष कदर केली. नॉएसिस २०२५ मध्ये आपली उत्तम कामगिरी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.