gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शिक्षकांसाठी ‘ऑनलाइन अभ्यासक्रमांची ओळख’ कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या शिक्षक गुणवत्ता आणि प्रशिक्षण समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या विद्यमाने ‘ऑनलाइन अभ्यासक्रमांची ओळख’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन केले गेले. कार्यशाळेला मुंबई विद्यापीठामध्ये आयडॉल विभागात गणित विभागात कार्यरत असणारे डॉ. मंदार भानुशे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी बदलत्या काळानुसार शिक्षकांनी कशा प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे याविषयी विचार मांडले. आजच्या काळात ई-लर्निंगची गरज कां आहे, मॉक म्हणजे काय? ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध असणारे ‘स्वयम’ नावाचं व्यासपीठ व ई-कंटेंट तयार करण्याचे विविध मार्ग याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षाचे समन्वयक डॉ. राजीव सप्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत समन्वयक डॉ. महेश बेळेकर यांनी केले. प्रचार्यानीही सहभागी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत ४० शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला. उपस्थित शिक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सदर कार्यशाळा उत्तमरीत्या संपन्न झाली. आभारप्रदर्शन डॉ. सीमा कदम यांनी केले.

Comments are closed.