मराठी विज्ञान परिषदेतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे विज्ञानरंजन कथा आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेकरिता ए-४ आकाराच्या कागदावरती एका बाजूस स्वहस्ताक्षरात लिहाव्यात. साहित्यासोबत आपला पत्ता, नाव, संपर्क क्रमांक व ईमेल पत्ता असावा.
कथा स्पर्धेकरीता किमान १००० ते ३००० इतकी शब्द मर्यादा आहे. सदर दि. ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, शिव चुनाभट्टी (पूर्व), मुंबई- ४०० ०२२ या पत्त्यावर पाठवाव्यात. निबंध स्पर्धेकरिता शब्द मर्यादा १५०० ते २००० अशी राहील. खुल्या वर्गाकरिता ‘स्थानिक प्रश्न आणि विज्ञान तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण’ व विद्यार्थी गटाकरिता ‘मोबाइलला आणि विज्ञान शिक्षण’ असा आहे. निबंध दि. ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत प्रा. ना. द. मांडगे, अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, न्यू रोज व्हिला, खोली क्र. १, राजी रामचंद्र मार्ग, चरई, ठाणे- ४०० ६०१ या पत्त्यावर पाठवाव्यात.
अधिक माहितीकरीता मराठी विज्ञान परिषद समानव्यक, रत्नागिरी विभाग, डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्याशी संपर्क साधावा. विस्तृत माहितीसाठी www.mavipamumbai.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.