gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पत्रकारिता कौशल्य विकास कार्यक्रम

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पत्रकारिता क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट संधी उपलब्ध झालीआहे. महाविद्यालयात हिंदी विभागामार्फत पीएम-उषा अंतर्गत ‘पत्रकारिताकौशल्य’ हा ३० तासांचा कोर्स दि. २८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरू करण्यात येणार आहे.

यामध्ये विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे मूलभूत ज्ञान, लेखनकौशल्य, संपादन, रिपोर्टिंग, एडिटिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंग यासारखी विविध कौशल्ये शिकवली जातील. विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानसोबतच व्यावहारिक प्रशिक्षणही दिले जाईल. विद्यार्थ्यांना पत्रकारिता क्षेत्रातील नवीनतम तंत्रज्ञानाची माहिती मिळेल. पत्रकारिता क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ प्रशिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. कोर्स समन्वयक म्हणून प्रा. कृष्णात खांडेकर हे काम पाहणार आहेत.

सदर कोर्ससाठी हिंदी विभाग प्रमुख डॉ. शाहू मधाळे यांनी मेहनत घेतली. कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनीशुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

Comments are closed.