gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘पत्रकारिता कौशल्य’अभ्यासक्रम संपन्न

‘समकाळात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विविध कौशल्ये आत्मसात केली पाहिजे, तरच भविष्य काळात येऊ घातलेल्या विविध आव्हानांना आपण सामोरे जाऊ शकू’, असे प्रतिपादन रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार श्री. राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केले. गोगटे – जोगळेकर महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने आयोजित ‘पत्रकारिताकौशल्य’या अभ्यासवर्गाच्या सांगता समारोपप्रसंगी ते बोलत होते.

महाविद्यालयात PM-USHA अभियान अंतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानातून विद्यार्थ्यांसाठी विविध प्रमाणपत्र, कौशल्य विकसन आणि व्यावसायिक कौशल्यावर आधारित अभ्यासवर्गांचे आयोजन करण्यात आले होते. हिंदी विभागाच्या वतीने दि. २८ जानेवारी, २०२५ ते १५ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत पत्रकारिता कौशल्य या कौशल्य विकसनावर आधारित अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यासवर्गाचा सांगता समारोप समारंभ नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी श्री. राजेंद्रप्रसाद मसुरकर प्रमुख अथिती म्हणून उपस्थित होते.

आपल्या मनोगतातून श्री. मसुरकर यांनी विद्यार्थ्यांना पत्रकारितेतील विविध संधींविषयी माहिती देऊन पत्रकारितेतील आव्हानां विषयीदेखील मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतातून हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे यांनीहिंदी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. तसेच हा अभ्यासवर्ग आयोजित करण्यामागील हेतू, त्यातून निर्माण होणाऱ्या नोकरी – व्यवसायाच्या संधी यावर थोडक्यात प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी होत्या. आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे पत्रकारांनी समाजाला योग्य माहिती देणे आवश्यक आहे. त्यासाठी पत्रकार होण्यासाठी पत्रकारितेचे शास्त्रशुद्धशिक्षण मिळणे आवश्यकआहे. हिंदी विभागाने आयोजित केलेला हा अभ्यासवर्ग उपक्रम निश्चितचस्तुत्य आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.

या अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे मूलभूत सैद्धांतिक ज्ञान, विविध बातमी लेखन कौशल्ये शिकविण्यात आली. विद्यार्थ्याना पत्रकारितेतील कामकाजाचा प्रत्यक्ष कार्यानुभव मिळावा म्हणून दैनिक सकाळ, रत्नागिरी विभागीय कार्यालयास क्षेत्रभेट देण्यात आली. या अभ्यासवर्गात श्री. राजेंद्रप्रसाद सखाराम मसुरकर, श्री. शिरीषदामले, श्रीकृष्ण देवरुखकर, श्री. संदीपन लावडे, प्रा. वंदना पाटील, प्रा. वसुंधरा जाधव या पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी हा अभ्यासक्रम यशस्वीरित्यापूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच कु. मीनल यादव हिने प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. या अभ्यासवर्गाचे समन्वयक म्हणून प्रा. कृष्णात खांडेकर यांनी उत्कृष्टपणे नियोजन केले. अभ्यासवर्ग यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन, तर पीएम-उषा समन्वयक आणि शास्त्र शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. कृष्णात खांडेकर यांनी केले.

Comments are closed.