gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या हिंदी संशोधन केंद्रातील संशोधक विद्यार्थी प्रा. राजेंद्र ननावरे यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या हिंदी संशोधन केंद्रातील संशोधक विद्यार्थी प्रा.राजेंद्र ननावरे यांना मुंबई विद्यापीठाची विद्यावाचस्पती पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील एक नामवंत आणि प्रतिथयश महाविद्यालय असून, महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेतील पारंपरिक पदवी-पदव्युत्तरपदवी अभ्यासक्रमांबरोबरच बीबीए, बीपीए, माहिती-तंत्रज्ञान, संगणकशास्त्र यासह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम चालविले जातात. महाविद्यालयात हिंदी, मराठी, वाणिज्य आणि लेखाशास्त्र, व्यावसायिक अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र इ. विषयांचे मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त संशोधन केंद्र कार्यरत आहेत. महाविद्यालयातसन १९५२ पासून हिंदी विभागाअंतर्गतपदवीचेव सन २००३ पासून हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण दिले जाते तर, सन २०१८ मध्ये हिंदी विद्यावाचस्पती (Ph.D.) संशोधन केंद्रास विद्यापीठाची विधिवत मान्यता मिळाली.

प्रा. राजेंद्र ननावरे हे मेढा येथील, जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या हिंदी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून, त्यांनी हिंदी संशोधन केंद्राअंतर्गत ‘हिंदी दलित आत्मकथाओं का समाजभाषावैज्ञानिक अध्ययन’ या विषयावर संशोधन करून मुंबई विद्यापीठाची विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली. त्यांना महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख डॉ.शाहू दशरथ मधाळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांना विभागातील प्रा. कृष्णात खांडेकर यांचे सहकार्य लाभले. सध्या अन्य चार विद्यार्थी हिंदी संशोधन केंद्रात संशोधन करीत आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला शाखा उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून हिंदी संशोधन केंद्राच्या भावी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.