gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयात पीएम-उषा अंतर्गत ‘Basic Mathematics for Competitive Exam’ सर्टिफिकेट कोर्सच्या प्रमाणपत्रांचे वितरण

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील गणित विभागाच्यावतीने पीएम-उषा अंतर्गत घेण्यात आलेल्या ३० तासांच्या ‘बेसिक मॅथेमॅटिक्स फॉर काँपिटेटीव्ह एग्झाम’ या सर्टिफिकेट कोर्सच्या प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम दि. ०९ मार्च २०२६ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाला परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे, स्कील एनहान्समेंट कोर्सच्या समन्वयक डॉ. चित्रा गोस्वामी आणि प्रमाणपत्र अभ्यासाक्रमच्या समन्वयक डॉ. यास्मिन आवटे उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभागातील कोर्सच्या विभाग स्तरावरील समन्वयक प्रा. स्पृहा जोशी यांनी केले. त्यात त्यांनी गणिताचे महत्त्व आणि दैनदिन जीवनातील उपयुक्तता सांगितली. तसेच गणित विभागप्रमुख डॉ. दिवाकर करवंजे यांनी विद्यार्थ्यांना या कोर्सची स्पर्धा परीक्षेतली उपयुक्तता समजावून सांगितली. या प्रसंगी डॉ. विवेक भिडे, डॉ. यास्मिन आवटे आणि डॉ. चित्रा गोस्वामी यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केले. डॉ. यास्मिन आवटे यांनी प्रयत्न आणि सराव यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा असे सांगितले. डॉ. विवेक भिडे यांनी नवीन स्किल्स शिकताना जुनी विसरू नये असा सल्ला मुलांना दिला तर डॉ. चित्रा गोस्वामी यांनी आपल्या देशातील प्राचीन व अर्वाचीन अशा विविध ज्ञान शाखांचा आढावा घेऊन वेगवेगळे ज्ञान मुलांनी अर्जीत करावे असे सांगितले.

गणित विभागाने हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने घेतला. डॉ. रंजन खातू, प्रा. प्रीती भिडे, प्रा. वृषाली मांडवकर, प्रा. गौरी दांडेकर, प्रा. तीर्था सोमण यांनी मुलांना मार्गदर्शन केले. सदर प्रमाणपत्र अभ्यासक्रम ४४ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला.

Comments are closed.