gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयात पीएम उषांतर्गत अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र वितरण

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने पीएम-उषा अनुदान अंतर्गत राबविण्यात आलेल्या ४५ तासांच्या दोन अभ्यासक्रमाचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास पीएम उषा समन्वयक तथा विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी प्रिपरेशन अँड एप्लीकेशन ऑफ ग्रीन मॅन्युअर अँड फर्टीलायझर या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे तसेच स्किल ऍनहानसमेंट कोर्स इन लँडस्केप डिझाईनिंग अँड मेंटेनन्स या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम यांनी केली. प्रिपरेशन अँड एप्लीकेशन ऑफ ग्रीन मॅन्युअर अँड फर्टीलायझर या अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. विराज चाबके तसेच स्किल ऍनहानसमेंट कोर्स इन लँडस्केप डिझाईनिंग अँड मेंटेनन्स या अभ्यासक्रमाचे समन्वयक प्रा. परेश गुरव यांनी संबंधित अभ्यासक्रमादरम्यानचे अनुभव सांगितले.

या कार्यक्रमासाठी प्रमाणपत्र समन्वयक डॉ. यास्मिन आवटे तसेच स्किल ऍनहानसमेंट कोर्स समन्वयक डॉ. चित्रा गोस्वामी देखील उपस्थित होत्या. कार्यक्रमास पीएम-उषासमन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी, गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी वनस्पतीशास्त्र विभागाच्या शैक्षणिक व उपक्रमशील कार्याचे कौतुक केले. महाविद्यालयाच्या ज. श. केळकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमासाठी प्रा. प्रियंका शिंदे-अवेरे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परेश गुरव यांनी केले.

Comments are closed.