gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) दि. १० जानेवारी रोजी खाजगी क्षेत्रातील बँकांकरिता ‘कॅम्पस ड्राईव्ह’

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे ‘करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल’ आणि पुणे येथील ‘ग्लोबल आऊटसोअर्सिग आणि ट्रेनिंग सर्व्हिसेस’ यांच्या संयुक्त विद्यमाने खाजगी क्षेत्रातील नामवंत बँकांकरिता कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कॅम्पस ड्राईव्ह शनिवार दि. १० जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता वाणिज्य शाखेच्या इमारतीत होईल. यामध्ये महाविद्यालयातून कोणत्याही शाखेतून २०१९ पासून २०२५ पर्यंत कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात.

या कॅम्पस ड्राईव्हबाबत अधिक माहितीकरिता प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंतदेसाई (मोबा. ९४२११४२५२९) आणि ‘ग्लोबल आऊटसोअर्सिगचे श्री. गणेश शहाणे (मोबा. ८९८३१९०६८२) यांचेशी संपर्क साधावा. खाजगी बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा असे आवाहन गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

Comments are closed.