गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) रसायनशास्त्र विभागातर्फे माजी विभागप्रमुख कै. प्रा. ए. एस. मुळ्ये स्मृती यांच्या स्मृतीप्रित्यर्थ परिसंवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्याना सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.
कै. प्रा. ए. एस. मुळ्ये यांनी प्राध्यापक आणि विभागप्रमुख महत्वाचे योगदान दिले आहे. ते एक विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. महाविद्यालयाचे नामवंत विद्यार्थी श्री. वामन नाटेकर यांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रसायनशास्त्र विभागाला भरीव देणगी दिले आहे. या देणगीच्या रकमेतून रसायनशास्त्र विभागाने परिसंवाद स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे आहेत-
green chemistry for sustainable development;
chemistry of climate change;
renewable energy; role of catalysis in modern chemistry;
artificial intelligence in chemistry.
सदर स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन समन्वयक डॉ. उमेश संकपाळ, विभाग प्रमुख डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी तसेच स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या https://gjcrtn.ac.in/ या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.