रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे प्रा. कै. ए. एस. मुळ्ये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय परिसंवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राज्यभरातील नामवंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले. याप्रसंगी माजी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या आणि रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा कुलकर्णी, स्पर्धेचे समन्वयक डॉ. उमेश संकपाळ, विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर नोकरी शोधण्याआधी संशोधनाकडे वळावे असे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून चिपळूण येथील डी.बी.जे. महाविद्यालयाचे प्रा. उदय बामणे आणि देवरुख येथील आठल्ये सप्रे महाविद्यालयाचे डॉ. हेमंत चव्हाण यांनी काम पहिले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.
या स्पर्धेत पुढीलप्रमाणे विद्यार्थ्यांनी पारितोषिके प्राप्त केली.
प्रथम क्रमांक – कु. आयशा इनायत खोत ;
द्वितीय क्रमांक – कु. पूर्वा संतोष पावसकर आणि कु. स्वरांगी सोबोध रांगणकर;
तृतीय क्रमांक – प्रेम सुरेश यादव;
उत्तेजनार्थ प्रथम – कु. वरदा महेश मुळ्ये;
उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक – कु. दिबा खडपोलकर आणि कु. ईकरा सय्यद.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. मेघना म्हादये यांनी केले.