gogate-college-autonomous-updated-logo

प्रा. रुपेश सावंत यांना पीएच.डी. (Ph.D.) पदवी प्राप्त

Dr. Rupesh Sawant

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कॉमर्स विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रा. रुपेश गिरीधर सावंत यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून ‘कॉमर्स’ या विषयात पीएच.डी. (विद्यापाचास्पती) ही पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या ‘कॉमर्स अॅन्ड मॅनेजमेंट’ या विभागाअंतर्गत संशोधनाचे कार्य पूर्ण करताना त्यांनी ‘प्रॉब्लेम्स अॅन्ड प्रोस्पेकट ऑफ वुमेन वर्कर्स इन सिलेक्टेड फ्रुट प्रोसेसिंग युनिट: ए स्टडी ऑफ रत्नागिरी डिस्ट्रीक्ट’ हा विषय निवडला होता. त्यांना या संशोधन कार्यात सायबर, कोल्हापूर येथील निवृत्त प्राध्यापक डॉ. सुरेश निकम यांनी मार्गदर्शन केले.

प्रा. रुपेश सावंत हे अध्यापनाबरोबरच महाविद्यालयाच्या ‘करिअर गाईडन्स अॅन्ड प्लेसमेंट सेल’चे समन्वयक म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडत आहेत. गेली २० वर्षे ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून आतापर्यंत त्यांनी एम.कॉम., एम.सी.एम., एम.पी.एम., एल.एल.बी., डी.बी.एम., जी.डी.सी. अॅन्ड ए. तसेच मॅनेजमेंट व कॉमर्स या दोन विषयात ‘नेट’ अशी शैक्षणिक अर्हता प्राप्त केली आहे. तसेच त्यांनी मुंबई विद्यापीठाचा लघुसंशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे. आतापर्यंत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ३७ कॉन्फरन्समध्ये सहभाग घेऊन आपले शोधनिबंध सादर केले आहेत. यातील २४ शोधनिबंध व लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

आतापर्यंतच्या आपल्या यशस्वी वाटचालीत प्रामुख्याने रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सहकारी प्राध्यापक यांचे प्रोत्साहन आणि सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कुटुंबियांचे पाठबळसुद्धा महत्वाचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

संशोधनातील यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीशजी शेवडे आणि पदाधिकारी, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, विभागप्रमुख प्रा. बी. सी. भिंगारदिवे, अकौंटंन्सी विभागप्रमुख डॉ. मकरंद साखळकर यांनी प्रा. रुपेश सावंत यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.