गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे भूतपूर्व प्राचार्य तसेच रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. व्ही. एन. बावडेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या या 39 व्या व्याख्यानमालेत डॉ. सुधाकर आगरकर, प्राध्यापक तथा अधिष्ठाता, वी पी एम्स अकॅडमी ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन, ठाणे हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत. संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. भौतिकशास्त्राची शाखा म्हणून क्वांटम मेकॅनिक्सच्या स्थापनेचे शतक साजरे करण्यासाठी ‘पुंजगतीकी आणि तंत्रज्ञान’ हा यंदाच्या व्याख्यानमालेचा विषय असणार आहे. दिनांक १ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता, महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहामध्ये सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. तरी सदरील व्याख्यानमालेसाठी रत्नागिरीतील विज्ञान प्रेमींना निमंत्रित करण्यात येत आहे.