गोगटे-जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालतील ग्रामीण विकास विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित (PM-USHA) अंतर्गत “ग्रामीण तंत्रज्ञान ” प्रमाणपत्र अभ्यासक्रम पाच दिवसांच्या कालावधीत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य व ग्रामीण विकास विभाग प्रमुख डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, पायाभूत अभ्यासप्रमुख प्रा. अरुण यादव, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कृषिविद्यावेत्ता डॉ. किरण मालशे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियानांतर्गत विद्यार्थ्यासाठी तंत्रज्ञान उपयोग व तंत्र वापरातील कौशल्य विकसित व्हावी म्हणून ग्रामीण विकास विभागातर्फे “ग्रामीण तंत्रज्ञान ” अभ्यासवर्ग सुरु करताना विद्यार्थ्यांना डॉ. किरण मालशे; कृषीविद्यावेत्ता यांनी कृषि क्षेत्रातील अभियांत्रिकीकरण व अत्याधुनिक यंत्र कशा पद्धतीने वापरली जातात याविषयी माहिती दिली.
श्री. दीपक गजानन साबळे यांनी फवारणी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फवारणीपंप कशा पद्धतीने चालवले जातात याविषयीची माहिती व दालचिनीच्या झाडाच्या फांदीवर गुटी कलम पद्धतीने कशी कलमे तयार याचे प्रात्यक्षिक कार्य विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली.
डॉ. संतोष मारोतराव वानखेडे, कीटकशास्त्रज्ञ यांनी मधुमक्षिका पालन व नारळावर पडणाऱ्या विविध किडींची व मित्र कीटकांविषयी विषयी व गांडूळ खत निर्मिती विषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली.
सौ. प्रियांका समीर नागवेकर यांनी नारळाच्या झाडावरती यंत्राच्या साह्याने चढण्याचे प्रशिक्षण दिले. नारळाच्या झाडावरती प्रत्यक्ष यंत्राच्या साह्याने चढण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यान केले.
डॉ. एस टी.पाटील, सहयोगी प्राध्यापक, कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली यांनी आधुनिक सिंचन पद्धतीतील ठिबक सिंचन व तुषार सिंचन पद्धती व या आधुनिक पद्धतीने पाणीपुरवठा करून शेतीतील उत्पादकता कशी वाढवता येते याविषयीचे मार्गदर्शन केले व प्रत्यक्ष जोडणी कशी केली जाते. याचे प्रात्यक्षिक कार्य विद्यार्थ्यांनी केले.
डॉ. एच. वाय. श्रीरामे, सहाय्यक प्राध्यापक, कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली – सौर ऊर्जा व सौर उर्जेवर आधारित उपकरणे व त्या उपकरणांची हाताळणी कशी करावी विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली.
डॉ. एन.ए. श्रीसाठ, कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली कृषि विद्यापीठाने विकसित केलेली आधुनिक कृषी अवजारांचा कृषी क्षेत्रामध्ये वापर करून शेतीतील उत्पादकता वाढवून शेतकऱ्यांचे शारीरिक श्रम व कमी वेळात जास्त काम कसे करता याविषयीचे मार्गदर्शन केले.
डॉ. मनिष कस्तुरे, कृषि रसायन व मृदशास्त्र प्रमुख, कृषि रसायन व मृदशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, दापोली – मृदा परीक्षण या विषयावर बोलत असताना मृदा परीक्षण करणे का गरजेचे आहे. मृदा परीक्षण केल्यामुळे कोणते कोणते फायदे होतात व ते न केल्यामुळे होणारे नुकसान याविषयीचे मार्गदर्शन केले.
डॉ. विजय दळवी, प्रभारी अधिकारी, कृषि संशोधन केंद्र, शिरगांव – भात शेतीमधील यांत्रिकीकरण, भाताच्या विविध जाती व शेतीमधील उत्पादकता कमी होण्याची विविध कारणांविषयी चर्चा तसेच आधुनिकतेची जोड देऊन भात शेती कशा पद्धतीने करता येऊ शकते याविषयी मार्गदर्शन केले.
डॉ. सुहास वासावे, मत्स्य महाविद्यालय, शिरगांव – संवाद कौशल्य याविषयी माहिती देत असताना संवाद कौशल्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. संवाद कौशल्य विकसित करण्याचे विविध मार्ग कसे आहेत याविषयीचे मार्गदर्शन केले.
श्री. राहुल मदने,बँक मॅनेजर – शेतीला आर्थिक सहाय्य देण्यामध्ये बँक कशा पद्धतीने कार्य करते. शेतीसाठी व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता कोणकोणत्या कर्जाच्या योजना आहेत. तसेच विद्यार्थ्यांना बँक क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी कोणत्या आहेत याविषयीची माहिती दिली.
अभ्यासक्रमाच्या शेवटच्या दिवशी ओमकार अॅग्रो एजन्सीमध्ये क्षेत्रभेट देऊन शेतीसाठी वापरण्यात येणारी विविध आधुनिक यंत्रे कशा पद्धतीने काम करतात. याविषयी माहिती घेऊन प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन ती यंत्रे कशा पद्धतीने वापरावी याविषयी प्रात्यक्षिक कार्य विद्यार्थ्यांनी केले. सदर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. डॉ. संतोष मारोतराव वानखेडे; कीटकशास्त्रज्ञ, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, प्राध्यापक श्री. अरुण यादव, पायाभूत अभ्यासक्रम प्रमुख, गोगटे-जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालय, रत्नागिरी, प्रा. श्रावणी विभूते, ग्रामीण विकास विभाग या सर्वांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
![]() |
![]() |
![]() |