gogate-college-autonomous-updated-logo

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘सहकार’ वार्षिक अंकाचे प्रकाशन संपन्न

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘सहकार’ वार्षिक अंकाचे प्रकाशन संपन्न

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राधाबाई शेट्ये सभागृहात कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहकार या वार्षिक अंकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, उपप्राचार्य विवेक भिडे, उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, उपप्राचार्या विशाखा सकपाळ, सहकारचे संपादक प्रा. मकरंद दामले उपस्थित होते.

सहकार वार्षिकांकाचे मुद्रक श्री. दादा जोशी आणि अंकाचे मुखपृष्ठ तयार करणारे श्री. श्रीकृष्ण पंडित यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सहकारचे संपादक प्रा. मकरंद दामले यांनी सहकारचे अंतरंग थोडक्यात उलगडून सांगितले. यावर्षीच्या सहकारमध्ये मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी आणि उर्दू भाषांतील विविध विषयांवरचे विपुल लेख आणि कविता समाविष्ट असल्याचे नमूद केले. यावर्षी संपादक मंडळाचे सदस्य म्हणून प्रा. आरती सरमुकादम, प्रा. जलील हुश्ये, प्रा. विस्मया कुलकर्णी, प्रा. अभिजित भिडे, प्रा. प्राजक्ता सुर्वे यांनी काम पहिले.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी विद्यार्थी सामाजिक भान आणि वास्तवाविषयी जागृत होत असून विविधांगी विषयांवर लिखाण करत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या बदलणाऱ्या प्रतिभेबद्दल समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमप्रसंगी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Comments are closed.