gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे-जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालयाच्या ‘सहकार’ वार्षिक अंकाचे प्रकाशन संपन्न

गोगटे-जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालयाच्या 'सहकार' वार्षिक अंकाचे प्रकाशन संपन्न

गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वरिष्ठ महाविद्यालयाच्या ‘सहकार’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या राधाबाई शेटये सभागृहात हा समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव प्रा. श्रीकांत दुदगीकर; कला, विज्ञान व वाणिज्य शाखांच्या उपप्राचार्या तसेच अभ्यंकर- कुलकर्णी  कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनिल गोसावी उपस्थित होते.

प्रकाशन सोहळ्यात सुरूवातीला सहकारचे संपादक डॉ. तुलसीदास रोकडे यांनी ‘सहकार’ या वार्षिक अंकाच्या अंतरंगाचा परामर्श घेतला. मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी व उर्दू या पाच भाषांतील विविध विषयांवरील लेखांचा, कवितांचा समावेश सदर अंकांमध्ये आहे. डॉ.तुलसीदास रोकडे यांनी आपल्या मनोगतात सहकार अंकाचे मुद्रक श्री. योगेश पंडित तसेच श्री. राकेश शेटये व संपादक मंडळाचे आभार व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सहकार हा विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीचे एक उत्तम व्यासपीठ आहे. तसेच हा अंक विद्यार्थ्यांच्या सृजनशील क्षमता विकसित करतो, असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. शिवाजी उकरंडे यांनी केले. सदर कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments are closed.