गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात, वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापकांनी ‘सामुहिक वाचन उपक्रमात’ उस्फुर्तपणे आपला सहभाग नोंदवला. महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयीन तरुणांना वाचनाकडे वळविण्यासाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत हा उपक्रम हाती घेतला आहे.
अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयांच्या पुस्तकांचे वाचन करून वाचन संस्कृतीचे संवर्धन करणे गरजेचे आहे. आज दि. ९ जानेवारी २०२४ रोजी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील प्राध्यापक एक तास सामुहिक वाचन उपक्रमात सहभागी झाले. त्यांनी आपल्या आवडीची विविध विषयांना वाहिलेली पुस्तके वाचली तसेच उपक्रमात आपला सक्रीय सहभाग नोंदवला. प्राध्यापकांच्या सामूहिक वाचनाच्या सहभागाने उपस्थित सर्व विद्यार्थी प्रोत्साहित झाले होते.
या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, डॉ. यास्मिन आवटे, डॉ. रुपेश सावंत, डॉ. आनंद आंबेकर, डॉ. अजिंक्य पिलणकर, डॉ. मीनल खांडके, प्रा. मंगेश भोसले, प्रा. स्वप्नील जोशी, प्रा. देवस्थळी, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे आणि इतर प्राध्यापक तसेच ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते.