गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात, कला विभागातील सर्व प्राध्यापकांनी ‘सामुहिक वाचन उपक्रमात’ उस्फुर्तपणे आपला सहभाग नोंदवला. महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयीन तरुणांना अभ्यासेतर वाचनाकडे वळविण्यासाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत हा उपक्रम हाती घेतला आहे.अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयांच्या पुस्तकांचे वाचन करून वाचन संस्कृतीचे संवर्धन करणे गरजेचे आहे. आज दि. १५ जानेवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या कला विभागातील प्राध्यापक ‘एक तास सामुहिक वाचन उपक्रमात’ सहभागी झाले. त्यांनी आपल्या आवडीची विविध विषयांना वाहिलेली पुस्तके वाचली तसेच उपक्रमात आपला सक्रीय सहभाग नोंदवला. प्राध्यापकांचे सामुहिक वाचन हा एक आगळा वेगळा उपक्रम वाचन संकल्प पंधरवड्याच्या निमित्ताने ग्रंथालयाने आयोजित केला. या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सामुहिक वाचनप्रसंगी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, हिंदी विभागप्रमुख डॉ. एस. डी. मधाळे, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे, इंग्रजी विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. अतुल पित्रे, ग्रंथालय समिती समन्वयक आणि संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. निधी पटवर्धन, प्रा. सचिन सनगरे, डॉ. सीमा वीर, प्रा. शिवाजी उकरंडे, प्रा. विनायक गावडे, प्रा. कृष्णात खांडेकर, प्रा. स्वामिनी चव्हाण, प्रा. पंकज घाटे, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे आणि इतर प्राध्यापक तसेच ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते. |